कुपवाड,केसरकर दांपत्य हत्या प्रकरणात आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये : कुपवाड संघर्ष समितीचे जिल्हा वकील संघटनेकडे निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/08/2026 10:34 PM

कुपवाड विघ्नहर्ता कॉलनी येथे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणातून घडलेल्या जीव घेण्या हल्ल्यात दाम्पत्य (मनीषा व मोहन केसरेकर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी फरीद शेख याच्या बाजूने सांगली जिल्ह्यातील किंवा बाहेरील कोणत्याही वकिलाने त्याचे वकीलपत्र घेऊ नये.

           या घटनेतील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला कायदेशीर मदत किंवा संरक्षण मिळू नये म्हणून वकिलांनी त्याचे वकीलपत्र स्वीकारू नये. म्हणून आज सांगली जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सी.डी.माने साहेब व ज्येष्ठ वकील ॲड.दत्ता वाठारे साहेब यांना संघर्ष समितीच्या वतीने विनंतीपूर्वक निवेदन दिले.

             तसेच जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रमोद भोकरे साहेब यांना हा खटला जलद गती न्यायालयात चालवून. या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयातील विशेष तज्ञ सरकारी वकिलाची नेमणूक करून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. म्हणून कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

              त्यावेळी समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोतरे, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, उपाध्यक्ष गोरख व्हनकडे, सामाजिक कार्यकर्ते अख्तरहुसेन मुजावर, समितीचे  खजिनदार अरुण रुपनर, रमेश जाधव, मुद्दसर मुजावर, मुस्ताक रंगरेज, विजय खोत, दाऊद मुजावर, तानाजी गडदे इत्यादी उपस्थित होते.

            आरोपीस फाशीची शिक्षा व पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या