भगूर सावरकर स्मारकास नाशिकचे पालकमंत्री व कुंभमंत्री गिरीश महाजन यांची भेट व स्मारकाची पाहणी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 11/09/2026 7:25 AM

भगूर येथील सावरकर स्मारकास नाशिकचे पालकमंत्री व कुंभमंत्री गिरीश महाजन यांची भेट व स्मारकाची पाहणी 

भगूर वार्ताहर:-महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व कुंभ मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देत स्मारकाची पाहणी केली यावेळी स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे,नगरसेवक दिपक बलकवडे,तानाजी करंजकर, तानाजी भोर यांनी महाजन यांना स्मारकाची माहिती देत स्मारका विषयी चर्चा केली. याप्रसंगी गिरीश महाजन यांनी पुरातन सावरकर स्मारकाची वास्तु पाहून सावरकरांच्या भुयार घर, धान्य घर,सावरकरांची अष्टभुजा देवी यासह स्वातंत्र्य काळातील सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी आहुती  दिलेल्या फोटो संग्रहाची माहिती जाणून घेतली यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुरातन वास्तू घर पाहण्याचं आपल्यास सौभाग्य लाभले असे महाजन यांनी उदगार काढले. याप्रसंगी भगुर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके ज्येष्ठ नगरसेवक दिपक बलकवडे यांनी नामदार गिरीश महाजन यांचे भगूर नगरीत स्वागत केले. याप्रसंगी भगूर नगर परिषदेचे नगरसेवक दिपक बलकवडे यांनी सावरकर स्मारकाची माहिती देताना सावरकर स्मारक अद्यावत बनवावे जेणेकरून भारत देशभरातील सावरकर प्रेमी या स्मारकास भेट देऊन सावरकर यांना नतमस्तक होतील तर भगूर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही दिपक बलकवडे यांनी नामदार महाजन यांच्याकडे केली.यावेळी नक्कीच पुढील काळात स्मारकासाठी व भगूर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन बलकवडे यांना दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव जिल्हा नेते लक्ष्मण सावजी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर,सिनेटचे सिनेटचे सागर वैद्य,जिल्हा सरचिटणीस शरद कासार, नगरसेवक विशाल बलकवडे, डॉ. मृत्युंजय कापसे,अमोल इंदारखे, बबलू जाधव,नगरसेविका सुजाता शिरसाठ,देवा बलकवडे,निलेश हासे, हिरामण आडके,अण्णाजी कापसे,निलेश शेंबाडे आधीच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते विलास कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले नामदार गिरीश महाजन यांनी कुलकर्णी यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेत कुटुंबाचे सांत्वन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या