भगूर नागरी सहकारी पतसंस्थेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; ९% टक्के लाभांश जाहीर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 28/09/2026 9:43 AM

भगूर नागरी सहकारी पतसंस्थेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; ९% टक्के लाभांश जाहीर
​भगूर वार्ताहार :-
भगूर नागरी सहकारी पतसंस्थेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी संताजी मंगल कार्यालय, भगूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत संस्थेच्या वतीने सभासदांसाठी ९% टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
​सभेच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन दत्ताजी कुवर आणि व्हाईस चेअरमन उमेश मोहिते यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात झाली.
सभेत बोलताना संस्थेचे चेअरमन दत्ताजी कुवर यांनी संचालक मंडळाच्या वतीने संस्थेचा ७१ वा वार्षिक अहवाल सभासदांपुढे सादर केला. ते म्हणाले, "सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात पतसंस्थेला २,३३,८६६ रुपये इतका शुद्ध नफा झाला आहे. संचालक मंडळाच्या एकमुखी कारभारामुळे आणि सभासदांच्या विश्वासामुळेच संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख निरंतर उंचावत आहे. अहवालातील तुलनात्मक आकडेवारीवरून संस्थेची बळकट आर्थिक स्थिती स्पष्ट होते.
या सभेला भगूरचे नगरसेवक तथा पालिका सभापती काकासाहेब देशमुख, माजी चेअरमन शंकर करंजकर, मनसे पदाधिकारी श्याम देशमुख, सुमित चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख विक्रम सोनवणे, माजी शिवसेना शहर प्रमुख अंबादास कस्तुरे, शेतकी सोसायटीचे भाऊसाहेब गायकवाड, माजी नगरसेवक उत्तम आहेर, आर. डी. साळवे, कामगार नेते अंबादास आडके राजेंद्र जाधव, श्याम ढगे, संजय जाधव. संभाजी देशमुख. शरद कातकडे. वेदांत घुमरे बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब कुटे, पांडुरंग आंबेकर. गायकवाड यांच्यासह सर्व संचालक, मंडळ व महिला वर्ग सभासद  मोठ्या संख्येने  उपस्थित होता.
​सभेच्या शेवटी संस्थेच्या वार्तांकनासाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शनाने सभेची यशस्वी सांगता झाली.

Share

Other News

ताज्या बातम्या