ह.भ.प. श्री कचरू महाराज गाढे यांची वारकरी संप्रदायाच्या अर्धापूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/09/2026 4:16 PM

अर्धापूर :- वारकरी संप्रदाय नाशिक मंडळाच्या वतीने भोगाव (ता. अर्धापूर) येथील ह.भ.प. श्री. कचरू महाराज गाढे यांची वारकरी संप्रदाय नांदेडच्या अर्धापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
वारकरी संप्रदायाच्या उद्देश,रचना व कार्यपद्धतीनुसार कार्य करण्याची तयारी दर्शविल्याने तसेच मंडळाच्या नियम व नियमावलीचे पालन करण्याच्या संमतीच्या आधारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय तथा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.श्री. आण्णासाहेब आहेर हिसवळकर यांच्या शिफारशीनुसार कचरू महाराज गाढे यांची पुढील पाच वर्षांसाठी अथवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या पुढील आदेशापर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी वारकरी संप्रदाय नाशिकचे राष्ट्रीय तथा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री.आण्णासाहेब आहेर हिसवळकर तसेच वारकरी संप्रदाय नांदेडचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. शेषेराव महाराज सूर्यवंशी यांनी कचरू महाराज गाढे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अर्धापूर तालुक्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्म, भक्ती, सामाजिक प्रबोधन आणि संतविचारांचा प्रसार करण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे कचरू महाराज गाढे यांनी सांगितले.त्यांच्या नियुक्तीचे वारकरी संप्रदायातील पदाधिकारी, वारकरी बांधव आणि भाविक भक्तांकडून स्वागत होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या