धर्म श्रद्धा आणि अंधश्रद्धा

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 02/03/2021 8:50 AM

             भारतात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात धर्मश्रद्धा हे आपल्या जीवनाचे एक वैशिष्ट्य आहे आपल्यापैकी बहुतेक जण मनापासून धर्मावर विश्वास ठेवत असतात धर्म हे जीवनाचे एक अविभाज्य अंगच वाटते चांगले वाईट. नैतिकता अनैतिक याविषयी कसोटी म्हणून लोक धर्माकडे पाहतात धर्माला जे मान्य ते चांगले नैतिक असे माणून आपले निर्णय घेण्याकडे लोकांचा कल असतो धर्मपरायण आणि सश्रधद जीवनामुळे आपल्या आयुष्याचे चीझ होते आयुष्याला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होते असा बहुतेकांचा विश्वास असतो हि धर्मश्रद्धा सर्वच लोकांच्या बाबतीत आढळून येते आपल्या ऐहिक जगाच्या पलीकडं ईश्वरी शक्ती अस्तित्वात आहे असा समज विश्वास यांच्या मनात भरतो असा विश्वास प्रामुख्याने श्रध्देचया मुळांशी असतो या श्रध्देने मग दैनंदिन जीवनात प्रार्थना पूजा ईशवरचिंतन देवदर्शन. धर्म ग्रंथांचे पारायण यांसारखे नित्य  उपचारांचा अनेक विधीचा संभारभाचा प्रवेश होतो परंपरेतून घरच्या प्रथामधून वडिल धारयाचया शिकवणुकीमधून आपल्या धर्माचा आपल्याला परिचय येतो. 
            धार्मिक तेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ईश्वरी शक्ती वरिल खोल श्रध्दा प्रत्त्येक धर्मात ईश्वरी कल्पना भिन्न आहे पण सर्वच धर्मामध्ये नतमस्तक होण्याची पध्दती संस्कृती आढळते आपल्या आणि भोवतालच्या जगाच्या अस्तित्वाचे कारणं ईश्वर आहे आणि तो सर्व जगाचे नियंत्रण करतो या भावनेने लोक ईश्वराला शरण जातात अगदी आपापल्या धर्माचे उपचार पूजाविधी यांचें काटेकोर पालन न करणाऱ्या मध्येही अशी ईशवरशरणता आढळतेच आपले दैनंदिन व्यवहार करताना ईश्वर  कृपा आणि कोप आपण विश्वास ठेवतो आणि समाजात व आपल्या जीवनात घरांत जे काही बरेवाईट घडते ते या कृपेचा आणि व अवकृपेचा प्रत्यय म्हणून आपण हे सर्व स्विकारतो म्हणून आपण देव पावला देव कोपला देवाचा प्रसाद  देव करो देव ठेवील तसे चालूधया यांसारखे शब्द प्रयोग वापरून आपली समजूत घालतो आणि मग आपण ईश्वर अस्तित्व कसे काम गृहित धरतो काय माहित पण आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींचे श्रेय ईश्वराला देऊन असीम ईशवरशरणता व्यक्त करतो.
             आपल्या धर्माबद्दल विचार करताना आपल्या डोळ्यासमोर धर्माचे एक विशिष्ट रूप  समाजातील ज्ञानी लोक उभे करतात आणि आशा व्यक्ति विशिष्ट धरमपंथाची किंवा संप्रदायाची असतें पुरातन काळापासून देव राक्षस या गोष्टी आपल्याला कोणी तरी सांगितलेल्या असतात त्यांचा वापर समाजातील काही उच्च वर्णीय लोकांनी आपले जगण्याचे भांडवल म्हणून वापर केला भारतीय संस्कृती थोर आहे बारा महिने बारा सण यात्रा जत्रा  मृत्यू नंतर विधी. लग्न विधी. असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या भारतीय संस्कृतीत आहेत  वातावरण हवामानात होणा-या महिनयानुसार बदल आणि त्यानुसार सणवार रचना करण्यात आली आहे मोठें सण. गुढीपाडवा. बेंदूर. दिपावली. होळी. रंगपंचमी रामनवमी. असे अनेक सण  रुतुनुसान बसविले आहेत जसे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल देतो बेंदूर वर्षभर रानांत राबून शेतीसाठी मदत करणारे बैल यांचा सण म्हणून साजरा केला जातो रानात पिके जोमात असतांत शेतीला पुरण पोळी नैवेद्य दाखवला जातो दिपावली ही हिवाळ्यात येते हिवाळ्यात थंडी खूप असते तळलेले पदार्थ आपल्या अंगात गरमाई निर्माण करतात म्हणून दिपावली मध्ये आपण तेलकट पदार्थ खातो सांगण्याचा उद्देश आपण आपल्या सवडीने निसर्गाला बसविले आहे रंगांची उधळण करणारा सण प्रत्त्येक शुभ अशुभ रंगाचा परिणाम सांगणारा सण म्हणजे रंगपंचमी अशा सर्व सणामागे एक एक रहस्य दडलेले आहे .
             सर्वात मोठा सण गौरी गणपती समाजातील काही लोकांचा गणपती दिड दिवसांत जातो याचे खरे षडयंत्र आहे ते म्हणजे सगळ्यांचा घरात गणपती असतात आपल्या घरातील गणपती दिड दिवसांत घालवून सगळ्यांच्या आरत्या महापूजा दक्षिणा शिधा गोळा करायला हा समाज मोकळा. गणपती दुखावला याची मोठी दहशत हा समाज आपल्या मनांत भरवतो. आपण ९ दिवस गणपतीचे मनोभावे पूजन करतो हि आपलीं श्रध्दा आहे.  लवकरात लवकर गणपती विसर्जन करणार्या वर गणपती कोप होत नाही का. अशा समाजात कधी सत्यनारायण पूजा झाली आहे का मी नाही बघितली कधी गावजेवन झाले आहे का. नाही हे आपण कर्ज काढून करायचेच आणि कोणतेही काम न करणारे कपड्याला डाग सुध्दा नाही असे लोक आपल्या आपल्यात फूट पाडून आणि अंधश्रद्धा पसरवून राज्य करतात यात्रा जत्रा. नविन पावने पयी आपल्याकडं याव यासाठी गावा गावात यात्रा भरविल्या जातात मग काय मटन दारु देवाच्या नावाखाली गरिब कोंबडी बकरी कापली जातात देव खात नाही पण त्याच्या नावाने आपलयासारखी भुते हे सर्व खातात. 
         वरील प्रमाणे सर्व आपण अनुभवले पण हे सर्व आपल्या मनावर बिंबवणारा एक विशिष्ट समाज असतो जसे. पंचांग. भुतबाधा. लागिर. उतारा. भानामती करणी. वेळेनुसार कथन करणारे. असा एक विशिष्ट समाज आपल्यावर कायम वचक ठेवून असतो जसे कोणत्याही धर्म ग्रंथामध्ये रक्त सांडून शान्ति मिळते असे लिहून ठेवलेले नाही  अमुक देवाला बकर कापा. तुमचं भल होईल  मी या देवाला नवस केल आहे की माझं अमुक काम झाल्यावर तुला कोंबड बकर कापतो असे म्हणतो आणि हे करायला सांगणारे भोंदु बुवा असतात आपण केंव्हाही असे ऐकले आहे का नवसापोटी कोणी वाघ कापतो असे नवस केले आहे का नाही कारणं आपले तत्व आहे कमजोरालाच बळी दिले जाते पंचांग सांगणारे गृह तारे यांचे मार्ग सांगणारे मंगळ शांती. नवगृह शांती कालसर्प योग. भुत लागलें लागिर झाल. भानामती मुठ मारणें असे विविध माध्यमे काढून सर्वसामान्य माणसाच्या मनात घबराहाट निर्माण करून असे संधी साधु भोंदू बाबा माणसाला आर्थिक दृष्ट्या लूटतात आपण वृतमापत्रात वाचतो मुलगा पाहिजे म्हणून बुवाबाजी चमत्कार करणार्या लोकांच्या मोहात पडून आपले सुखी संसार उध्वस्त केलेलीं कित्येक प्रकरणे आपण वाचतो. हि अशी लोक आपल्या श्रध्देचा गैरफायदा घेतात मृत्यूच्या विविध विधी करण्यासाठी सुध्दा असे भोंदू बरिच पैसा उखळणी करतात अमुक ठिकाणी शांती करा नाहीतर लाभ होणार नाही शांती करण्याचे सामान हजारो रूपयांचे असते त्यातले कोणी काही घरि आणू नका या भोंदू बाबा यांनी आपल्या घरि सामान नेले तरी चालते वासाचाच तांदूळ लागतो साधा चालतं नाही सगळ्या गावांची भुतं काढणारे बाबा लोक त्यांचेवर एखादे भुत का बसत नाही ते काय यांचें सगेसोयरे आहेत काय सर्वांचे भविष्य सांगणारे रोज सकाळी झोळी अडकून भिक का मागतात कारणं यांना काही कळतच नाही आपण अंधश्रद्धेचे पोटी यांना बळि पडतो आणि फसतो.
               आषाढ महिना आला की जागोजागी कोंबडी बकरी कापली जातात कारणं आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडतो त्यामुळे हवामानात गारठा जादा असतो आपल्या अंगात उष्णता निर्माण करण्याचे काम मांस करते म्हणून आषाढ महिन्यात देवदेवतांच्या नावाखाली असे विधी केले जातात त्यानंतर श्रावन महिना एक एक जण देव प्रसन्न होण्यासाठी श्रावन पाळतात पण त्याचे कारणं आहे आषाढ महिन्यातील जादा पाऊसामुळे पिके वाढ झालेली असतात त्यामुळे विविध रोगाला आमंत्रण देणारे किटक जंतू पिकांवर येतात आणि हे गवत शेळ्या मेंढ्या खातात त्यामुळे त्यांना विषबाधा होण्याचा धोका असतो आणि जर आपण त्यांचे मांस खाल्ले तर आपणांस सुध्दा विषबाधा होण्याचा धोका असतो म्हणून आपण देवाच्या भक्ती या फसव्या कारणांमुळे श्रावन पाळतो मग आपला देवावर विश्वास आहे का ? 
        आपल्याला हुशार होण्याची गरज आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत व सर्व दैनंदिन जीवनातील सर्व घरांची भुमीपूजन. वास्तुशांती.  विधी कार्य करण्यासाठी आपण आपले पैसे खर्चून   गावातील मंदिरे त्यातील पूजाअर्चा करणारी लोक यांनी आपणावर काय तरी जादूटोणा केला आहे आत्ता आणि अजून आपण या अशा प्रवृतीचे गुलाम आहोत आपण आपल्या मुलांना या अशा भोंदू बाबा यांचे पासून वाचवा श्रध्दा ठेवा पण अंधश्रद्धा नको 
 वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा 
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९ 
लातूर जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आज ७ दिवस उपोषण चालू आहे सर्वसामान्य माणूस आपल्या हक्क व अधिकार यासाठी उपोषण करत आहे सात दिवस झाले तरी कोणत्याही अधिकार व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही शासकीय दवाखान्यातील एकही डॉ तपासणी करण्यासाठी घटनास्थळी गेलेला नाही अस झाल तर सर्वसामान्य माणसाला मेलतरी न्याय मिळणार नाही आपण कोणी त्या जिल्ह्यात जवळ असेलतर आवश्य उपोषण ठिकाणी भेट द्यावी








निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी)
9405228787

Share

Other News

ताज्या बातम्या