ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाड नेहमी वेंटींगवरच का ?


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/2/2021 10:05:33 AM

 ## सर्वपक्षीय नगरसेवकांनी कुपवाड साठी दबावगट निर्माण करण्याची गरज...कुपवाड मधील ऍलोपॅथिक दवाखाना केंद्र क्र 4 येथे मागणी केल्यावरच न्याय मिळते. नेहमीच असा दुजाभाव का होतो? बरं हया एका गोष्टीतच नाही, प्रत्येक गोष्ट मागीतल्यावरच द्यायचे असे प्रशासन व कारभाऱ्यांनी ठरवले आहे का ? का प्रत्येक वेळी समाजिक कार्यकर्ते यांनी आवाज उठवल्यावरच मागणीचा विचार करणार... प्रत्येक वेळी कुपवाडवरच अन्याय का ? असा खडा सवाल आता समस्त कुपवाडकर विचारत आहेत. वास्तविक कोविड लसीकरण चालू करताना कुपवाडसाठीही तेथील आरोग्यकेंद्रात सोय करायला पाहीजे होते, ही काही सांगायची किंवा सुचवून दयायची गोष्ट नाही.का मनपा प्रशासन ठरवून असे करत आहे...खालील यादीमध्ये कुपवाडमधील लसीकरणासाठी येथील आरोग्यकेद्राचे नावच नाही. का कुपवाडकरानी लसीकरणासाठी सांगली किंवा मिरजेला जाणे अपेक्षीत आहे.

     "यामध्ये  कुपवाड दवाखाना समाविष्ट नाही.  प्रशासनाने कुपवाडमध्ये ज्येष्ठ नागरिक राहत नाहीत  याची  खात्री केली आहे  वाटते. प्रशासनातील  अधिकारी कुपवाडसाठी दुजाभाव  करतात. त्यामुळे त्यांना  मनःपूर्वक धन्यवाद  व चुकीचे व नियोजन करणा-या अधिकारी  मंडळाचे  हार्दिक अभिनंदन"   
     अश्या संतप्त प्रतिक्रीया समाजरामाध्यमातुन उमटत आहेत.


जेष्ठ नागरिकांच्या माहितीसाठी
सामिकू मनपा क्षेत्रात महापालिकेच्या खालील ठिकाणी असणाऱ्या आरोग्य केंद्रात कोविड लस उपलब्ध असेल 

1) हनुमान नगर
2) शामरावनगर
3) साखर कारखाना
शिवाजी हाऊसिंग
4) जामवाडी
5) समतानगर मिरज
6) मिरज इंदिरानगर
7) मिरज अर्बन
8) द्वारकानगर मिरज
9) विश्रामबाग 
या ठिकाणच्या आरोग्य केंद्रावर सकाळी 9 ते 4 यावेळेत जेष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील कोमॉरबीड व्यक्तींना कोव्हीशिल्डचे लसीकरण केले जाईल: 

सोबत आधारकार्ड घेऊन येणे

Share

Other News