विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोलीची मागणी
गडचिरोली :-
जिल्हातील आदिवासी उपयोजन क्षेत्रात असणाऱ्या शाळांचे व तुकडयावरिल शिक्षकांचे वेतन अतिशय विलंबाने होतात. या करिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोली द्वारे शिक्षणाधिकारी यांना प्लान मधिल शाळा नॉनप्लान मध्ये आणन्याकरिता निवेदन देण्यात आले. जिल्हातील आदिवासी उपयोजन क्षेत्रातील बहुतांश शाळांचे वेतन नोव्हेंबर 2020 पासूनचे वेतन प्रलंबित आहेत. वेतन पथकाकडे चौकशी केल्यास या शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतनाचे लेखाशिर्ष 1901 यामध्ये वेतन अनुदान शासनाकडून अप्राप्त असल्याने सांगितले जाते.
सर्वसाधारणपणे शाळांना वेतन अनुदान मंजूर झाल्यापासून पाच वर्षाच्या समाप्तीनंतर या शाळांचे रूपांतर प्रचलित धोरणानुसार प्लान मधून नॉनप्लान मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु जवळपास 12 ते 13 वर्षाचा कालावधी लोटून सुध्दा अजूनही या शाळांचे रूपांतर नॉनप्लान मध्ये झालेला नसल्याने या शाळांतील कर्मचाऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. हि खेदाची बाब आहे.
वेतन उशिराने होत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असून घर बांधकामासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरचा व्याजाचा बोजा आणखी वाढत जातो आहे म्हणून लेखाशिर्ष 1901 यात पुरेसे वेतन अनुदान उपलब्ध करून द्यावे.तसेच या शाळा व तुकड्यांना तात्काळ प्लान मधून नॉनप्लान मध्ये रूपांतरित करण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोली द्वारे निवेदनात करण्यात आली. शिक्षणअधिकाऱ्यांना निवेदन देतांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाकार्यवाह अजय लोंढे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, संघटक सचिव सुरज हेमके, सहकार्यवाह माणिक पीलारे, आनंदराव बगमारे, खुशाल मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आशिष अग्रवाल (गडचिरोली जिल्हा मुख्य संपादक)
7757005944