महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित नवीन प्राथमिक शाळा ,सांगली येथे आज "घरातील ओल्या-सुक्या कचऱ्यापासून कॉम्पोस्ट" या विषयावर कार्यशाळा पार पडली.
स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपली सांगली स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रशासन,स्वयंसेवी संस्था कार्यरत असताना च, एक शैक्षणिक संस्थेने कचऱ्याच्या प्रश्नावर काम करण्यासाठी पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमाला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे ,संस्थेचे सेक्रेटरी चौगुले, व्यवस्थापक विनायक पवार, आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी आणि आयुष च्या संपदा पाटील, गीतांजली उपाध्ये हजर होत्या.
या वेळी डॉ.रवींद्र ताटे सरांनी शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रशासन सज्ज आहेच,लोकांच्या ही सहभागी गरज मांडली. कोविड च्या काळात योग्य काळजी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे ,तसेच कचरा वेगळा करून रिसायकलींग किंवा विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे द्यावा असे सांगितले.
यानंतर संपदा पाटील यांनी घरातील कचऱ्याचे सोप्या पद्धतीने वर्गीकरण आणि त्या पासून घराबाहेर जाणारा कचरा कसा कमी करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी स्वयंपाक घरातील सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून आणि वाळलेल्या पानांपासून कमी जागेत,सहज बनणारे कंपोस्ट खत बनवून आपण घरीच सेंद्रीय भाज्यांची लागवड करू शकतो याबद्दल सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले.