डॉक्टर व नर्स सोबत वाद घालणाऱ्यावर होणार कारवाई- जिल्हाधिकारी संदीप कदम

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 18/04/2021 8:07 PM



रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण संख्या पाहता वैद्यकीय यंत्रणेवर आधीच मोठ्या प्रमाणात ताण आहे अशाच रुग्णांची काही नातेवाईक डॉक्टर व नर्स यांच्यासोबत हुज्जत घालतात. कधीकधी मारहाण सुद्धा करतात.ही बाब योग्य नसून अशा घटना घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिला आहे.
 कोविड -19 रोगाच्या हा काळ अत्यंत कठीण असून या काळात सर्व प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा लोकांना सेवा देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे.रुग्ण संख्या वेगाने वाढत असून प्रत्येक रुग्ण हा महत्त्वाचा आहे. त्या मनुष्यबळाच्या जोरावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. डॉक्टर नर्स आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत असे त्यांनी सांगितले.
 या काळात अनेक डॉक्टर व नर्स पॉझिटिव सुद्धा आले आहेत.ही बाब लक्षात घेता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी संयम बाळगून सहकार्य करणे अपेक्षित आहे. रुग्णांच्या संख्येत नातेवाईक धीरोदात्तपणे सहकार्य करत आहेत. मात्र काही लोक डॉक्टर व नर्स यांच्यासोबत हुज्जत घालून कायदा हातात घेतात.ही बाब योग्य नसून यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे.
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता त्या मनुष्यबळाच्या सहकार्याने अधिकाधिक उत्तम उपचार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना रुग्णांच्या नातेवाइकांकडून उपचार पद्धतीत हस्तक्षेप,वादावादी, भांडणं व मारहाण असे प्रकार होताना दिसत आहेत.ही बाब गंभीर असून असे करणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करणार आहेत. याची नोंद घ्यावी यापूर्वी अशा घटनांमध्ये गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.
आपला व आपल्या कुटुंबियांच्या जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर व नर्सेस सोबत व्यवहार करताना संयम ठेवणे आवश्यक आहे.रुग्णांच्या नातेवाईकांची अगतिकता प्रशासन समजू शकते मात्र उपलब्ध साधन सुविधेत उत्तम व तत्पर सेवा देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी मानवतेच्या परिचय देत प्रशासनाला सहकार्य करावे व डॉक्टर आणि नर्सेस चे मनोबल वाढेल असेच आपले वर्तन ठेवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या