खा.अशोक नेते यांनी घेतला जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 19/04/2021 6:12 PM

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश

खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नातून केंद्राकडून जिल्ह्याला मिळणार 250 ऑक्सिजन जनरेटर

गडचिरोली :- दि. 19 /4
         खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.19 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कोविड च्या महाभयंकर आजाराबाबत जिल्ह्यातील सध्यस्थीतीचा  आढावा घेण्यासाठी सर्व संबंधीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटर, कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव, जिल्ह्यातील परिस्थिती, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेले निर्बंध याबाबतचा सविस्तर आढावा घेतला व परिस्थिती हाताळण्यासाठी यथशिग्र उपाययोजना करून नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
          या बैठकीला खासदार अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, महिला आघाडी च्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, जिल्हाधिकारी दीपक सिंगला,मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शंभरकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे,तसेच अन्य संबंधित अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

         खासदार अशोक नेते यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजन जनरेटर ची मागणी केली होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून 250 ऑक्सिजन जनरेटर चा पुरवठा गडचिरोली जिल्ह्यासाठी होणार असून लवकरच ऑक्सिजन जनरेटर जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी सांगितली.
        तसेच रेमडीसिएन इंजेक्शन चा पुरवठा गडचिरोली जिल्ह्याला जास्तीत जास्त होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.तथा कोरोना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी नागरिकांना उचित आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.






निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी)
९४०५२२८७८७

Share

Other News

ताज्या बातम्या