रुग्णांच्या नातेवाईकांना रिमडेसिवर इंजेक्शन व इतर दवाई बाहेरून आणण्यास सांगू नये अन्यथा होणार कार्यवाही -जिल्हाधिकारी संदीप कदम

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 19/04/2021 10:46 PM



रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :-राज्य शासनाने संदर्भ क्रमांक ०१ आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ चे कलम अन्वये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २,३ व ४ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तर तयार करण्यात आली असून स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक ०२ मधील परिच्छेद नुसार कार्यक्षेत्रात कोविड -१९ वर नियंत्रण आणणे व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत.त्या अर्थी या कायद्याच्या नियम १० अन्वये जिल्हाधिकारी यांना कोविड -१९  प्रादुर्भाव रोखण्याकरिता,आवश्यक त्या उपाययोजना करण्याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या अर्थी भंडारा जिल्ह्यात सध्यास्थिती कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड -१९ अनुषंगाने सर्व खाजगी सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून आवश्यक रुग्णास रेमडेसिविर या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात पुरवठा होणारे रेमडेसिविर हे फक्त आणि फक्त संबंधित रुग्णालयात देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. करिता संबंधित हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉक्टर यांना या कार्यालयाचे आदेशानुसार पुरविण्यात आलेले इंजेक्शन देण्यापूर्वी Annexure From No. B भरून द्यावा असे आवश्यकता असलेल्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा किंवा इतर साहित्य बाहेरून आणण्यास सांगू नये किंवा Prescription देऊ नये सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास उपरोक्त तरतुदीनुसार संबंधितांविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या