तुमसरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार राष्ट्रवादी काँग्रेस चे नं.पा.मुख्यधिकाऱ्यांना निवेदन

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 20/04/2021 5:10 PM




रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :- जीवनदायनी वैनगंगा नदीद्वारे तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे ५ दिवसापासून नळांना पाणी आलेच नाही.म्हणून तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने मुख्यधिकारी नगर परिषद तुमसर यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी ताबडतोब सुरु करण्याबाबत निवेदन देण्यात आले.नगरपरिषद तुमसर द्वारे पाण्याच्या पुरवठा होत नसल्याने तुमसरात पिण्याच्या पाण्यासाठी गत पाच दिवसापासून हाहाकार माजला.एप्रिल महिन्यापासून कडक उन्हाची चणचण भासू लागली एकीकडे कोरोनाचा संसर्गामुळे नगर परिषदेकडून दहा दिवसीय कडक लॉकडाऊन लावण्यात आले व दुसरीकडे पाच दिवसापासून नळाला पाणी येईना त्यामुळे नागरिक त्रस्त होऊन नागरिकांकडून पाणी पट्टी कराच्या नावावर कडक मोहीम राबवून जबरान कर वसूली करण्यात आली पंरतु नळाला पाणी नं आल्याने नगरपरिषद प्रशासनाची शहरात एकही कर वसूली पथक फिरकले नाही.नळाला पाणी नं आल्याने नागरिकांमध्ये संताप पसरलेला आहे.लोकांना पाण्याविना जीवन कठीण झाले आहे. त्यामुळे तुमसर राष्ट्रवादी काँग्रेस द्वारे नगर परिषदेचे अभियंता वीरेंद्र ढोके यांना निवेदना द्वारे नागरिकांना नियमित पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले.अन्यथा नगरपरिषदे समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.निवेदनावर ढोके यांनी माडगी नदीतील मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरविता आले नसून त्याचे काम युद्ध पातळी वर सुरु असल्याचे सांगून उद्या दिनांक.२१.०४.२०२१ ला पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले आहे.निवेदन देतांना भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे महासचिव विजय कुमार डेकाटे, तुमसर शहर अध्यक्ष राजेश देशमुख, न. पा.नगरसेवक सलामजी तुरक, तिलक गजभिये महासचिव सामाजिक न्याय विभाग, सुनील थोटे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, प्रदीप भरनेकर शहर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस, सुदीपजी ठाकूर,अतुलजी सार्वे, पूनमजी मेश्राम, रमेश गायधने, संजय लाखा व राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या