ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

युवासेनाप्रमुख मंत्री आदीत्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/14/2021 8:10:54 AM


     सांगली जिल्हा युवा सेने चा वतीने  मंत्री, युवा सेना प्रमुख मा श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले.सांगली येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथे 
एचआयव्हीग्रस्त मुलींना शालेय साहित्य वाटप केले तसेच मिरज येथील आस्था महिला निवारा  केंद्र येथे पीडित  भटक्या महिलांना कपडे,चादर व शिधा वाटप करण्यात आले, माहेर सेवा संस्था मिरज येथील मनोरुग्ण व पिडीत महिलांना व लहान मुलांना 3 पंखे,तांदूळ 200kg देण्यात आले, तसेच आस्था बेघर महिला निवारा केंद्रेमधील इयत्ता 7 वि मध्ये शिकणाऱ्या मुलीचे पालकत्व युवा सेना सांगली जिल्हा चा वतीने घेण्यात आले, बेळणकी गावी ग्राम स्वच्छता अभियान घेण्यात आले, सांगली शहर महापालिका क्षेत्रात  100 हुन अधिक वेग वेगळ्या ठिकाणी फळ झाडे लावण्यात आली, या कार्यक्रमाचे ठिकाणी मा रणजित जाधव,युवा सेना जिल्हा अधिकारी,मा रविराज कुकडे, मा ओंकार जोशी युवा सेना मिरज शहर अधिकारी, किरण भोसले युवा सेना उपजिल्हाधिकारी, मा राहूल यमगर युवा सेना सरचिटणीस सांगली, मयूर गायकवाड, अभिजित दानेकर उद्यजक मिरज शहर, सुहाना नदाफ युवती सेना प्रमुख, चंद्रकांत मैंगुरे शिव सेना प्रमुख मिरज शहर,तानाजी दादा सातपुते,सचिन कांबळे जिल्हा संघटक युवा सेना, फारूक शेख,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News