*संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्या* *चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांची उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 14/06/2021 3:13 PM

  चंद्रपूर

मागील दोन वर्षात शैक्षणिक वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याना शाळा महाविद्यालयात जाताच आले नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांचे वर्ग होत आहेत. यात अनेक विद्यार्थी असे आहे कि ज्यांना कुठलीही शैक्षणिक सवलत मिळत नाही किंवा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती होत नाही. असे असताना शिक्षक अथवा प्राध्यपक यांचे पगार तर करावेच लागतात परंतु शाळा महाविद्यालयामध्ये विजेचा खर्च वाचतो, मेंटनन्स खर्च सुद्धा वाचतो आणि ऑनलाईन किंवा आभासी पद्धतीने शाळा होत नसल्यामुळे शाळा महाविद्यालयाच्या पुस्तकांचाही खर्च वाचत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्या अशी लोकहितकारी मागणी चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे केली आहे.  बरेच विद्यार्थी हे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्यांना उपभोग न घेतलेल्या सोईचे हि फी रूपाने द्यावे लागणार आहे. करीत जो खर्च शाळा महाविद्यालयाचा झालाच नाही त्या खर्चाचा भुर्दंड या विद्याथी वर्गावर का ? त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फी मधून कमीत कमी खर्च बगळावा व फी कपात करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे केली. यावेळी एन. एस. यु. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, संतोष सातपुते, श्रद्धेय मत्ते, दिलराज बैस यांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या