ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*राज कुंद्राचा ‘हॉटशॉट’ नंतर होता मेगा प्लॅन*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/1/2021 4:52:09 PM

     ⭕‘व्हॉट्स अ‍ॅप’ चॅटमधून फुटलं बिंग.......
 
मुंबईत सुरू असलेल्या एका पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅप प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आणि खळबळ उडाली. 
सध्या राज कुंद्रा कोठडीत असून, 
व्हॉट्स अ‍ॅपवरून झालेल्या चॅटमुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. 
पॉर्न अ‍ॅप हॉटशॉट प्ले स्टोअरवरून हटवण्यात येणार असल्याची कल्पना राजला होती आणि त्यामुळेच त्याने दुसरा मोठा प्लॅनही तयार केला होता. 
व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधूनच हे बिंग फुटलं आहे. 
गुगल प्ले स्टोरने राजच्या पॉर्नोग्राफी कंटेट पुरवणाऱ्या हॉटशॉट अ‍ॅपला हटवल्यानंतर राज कुंद्रा इंग्लडमधील कायद्याला धरून दुसरं अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत होता, 
अशी माहिती समोर आली आहे. 
‘इंडिया टूडे’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 
व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. 
हॉटशॉट अ‍ॅप व्यवहाराची चर्चा करण्यासाठी राज कुंद्राने ‘H Account’ नावाचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला होता.
 त्या ग्रुपमध्ये या अ‍ॅपबद्दल सर्व चर्चा केल्या जायच्या. चॅटमधील मेसेजेसनुसार, ‘ह़ॉटशॉट अ‍ॅप’वरून कुंद्राला चांगली कमाई होत होती. 
मात्र, अडल्ट कंटेट असल्यानं ‘गुगल प्ले स्टोर’नं हे अ‍ॅप हटवलं होतं. 
राज कुंद्राच्या या ग्रुपमध्ये प्रदीप बक्षी नावाचा एक व्यक्ती होता. 
त्याने हॉटशॉट अ‍ॅप का हटवले याबद्दल गुगल प्ले स्टोरनं दिलेला रिव्ह्यू शेअर केला होता.
 त्यावर राज कुंद्राने रिप्लाय केलेला आहे. 
राज कुंद्रा म्हणतो, 
“ते ठीक आहे. 
आपला प्लॅन बी तयार असून पुढच्या २-३ आठवड्यात नवीन अ‍ॅप सुरू होईल. 
हे अ‍ॅप ios आणि Android दोन्हीमध्ये काम करेल,” 
असं तो ग्रुपमधील सर्वांना सांगतो.

Share

Other News