तुमसरातील अतिक्रमण धारकांना पट्टे मोफत द्या - अभिषेक कारेमोरे

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 01/08/2021 5:44 PM



हक्काच्या निवाऱ्याचे स्वप्न अधुरेच !

नं.पा.तुमसरने केली शासनाच्या नियमाची पायम्मली 

रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर :- प्रत्येकाला हक्‍काचे घर मिळावे, यासाठी शासनाने अतिक्रमणधारकांना जमिनीचा हक्‍क देण्याचा निर्णय घेतला होता. शहरी भागात काही प्रमाणात याची अंमलबजावणी झाली.परंतु अद्याप अतिक्रमण धारकांना पट्टे नं मिळाल्याने गरिबांच्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सचिव अभिषेक कारेमोरे यांनी तुमसर शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे मोफत देण्याची मागणी रेटून धरली आहें.सर्वाधिक लोकसंख्येच्या तुमसर शहरात हजाराहून अतिक्रमण धारकांच्या कुटुंबाचा प्रश्न आहें.अर्ध्या शतकापासून वास्तव्य असलेल्या या नागरिकांची नावे घरकुलाच्या यादीत आली. पण, जागेचे पट्‌टे नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जागेचे पट्टे मिळावे यासाठी शासनाच्या दरबारी नागरिक येरझारा मारत आहेत. स्थानिक नेत्याकडून मताचे गणित साध्य करण्याकरिता जागेचे पट्टे देण्याचे आश्‍वासन दिले गेले होते पण,ते हवेतच विरले गरीब स्वकष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो पण त्यांना हक्काचे घर हवे आहे. यासाठी अतिक्रमित जागेचा हक्‍काचा पट्टा मिळावा या लाभासाठी स्वत:च्या हक्काची जागा असल्याचा पुरावा पाहिजे. तो त्याच्याकडे नाही. यामुळे गरीब कुटुंबाना घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.२०११ पूर्वीचे शासकीय अतिक्रमण नियमित होणार असे शासनाने २०१८ साली शासन निर्णय काढून केंद्र व राज्य शासनाने सन २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबाना घर देण्याची महत्वकांक्षा मोहीम हातात घेतली आहें.नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सचिव मुखाधिकारी नगर परिषद यांची समिती नेमून त्या समित्यानी सहायक संचालक नगर रचना यांच्या सल्याने १५०० चौ. फुटाच्या मर्यादेत अतिक्रमणे नियमित करण्याची कार्यवाही करायची आहें.परंतु नगर परिषद तुमसर येथे मागील ४ वर्षांपासून फक्त आपला पोट कुठे भरतो त्या कामाकडे लक्ष देऊन गरिबांच्या हक्काच्या घरावर पाय मारण्याचे काम स्थानिक प्रशासनाने करून शासनाच्या नियमाची पायमल्ली केली आहें.नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्या अतिक्रमण धारकांना पट्टे मोफत देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे यांनी केली आहें. तरी प्रशासनाने या गरिब कुटुंबावर अन्याय नं करता तात्काळ पट्टे देऊन त्यांना हक्काचे घरकुल द्यावे.


पट्टे मोजमाप करण्याकरीता लागणारे शुल्क व त्याचे नियोजन नगर परिषदेने करावे. त्याकरीता तसा ठराव घेवून प्रक्रिया पार पाडावी. लाभार्थ्यांना मोफत पट्टे नं मिळाल्यास पुन्हा नगर परिषदेवर आंदोलनातून न्याय मागितला जाईल.

अभिषेक कारेमोरे
माजी नगराध्यक्ष प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर

Share

Other News

ताज्या बातम्या