ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

#माणचे विद्यमान तहसीलदार यांची धडाकेबाज कारवाई #


  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 10/26/2021 12:22:25 PMआर टी आय न्यूज नेटवर्क 
 प्रतिनिधी/ सातारा

        मोगराळे ता माण येथील घाटा नजीक जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आज पहाटे पाच वाजता तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी कारवाई केली.
    माण तालुक्यातून फलटण कडे जाणाऱ्या मोगराळे घाटा जवळून अनधिकृत वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सूर्यकांत येवले यांना समजली होती त्यानुसार आज पहाटे अचानक त्यांनी सादर ठिकाणी भेट दिली असता MH 14 F 5658 हा टेम्पो त्यांनी तपासणी साठी थांबवला व चालक विजय बाळू वणवे यांच्याकडे विचारणा केली तर त्यात दोन ब्रास वाळू आढळून आली सादर वाळूची अनधिकृत वाहतूक होत होती सदर टेम्पो विडणी ता फलटण येथील सुशील सुरेश जगताप याच्या मालकीचा असून त्यावर कारवाई करत सदर वाहन दहिवडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

माण तालुक्यात गौण खनिज उत्खनन आणि त्याची चोरी होत असेल तर त्यावर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करणार असलेचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी सांगितलं 
    

Share

Other News