ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*गडचिरोली जिल्हयात 478 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधित निरंक आज कोरोनामुक्तही नाहीत*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/26/2021 10:47:14 PM

गडचिरोली, (जिमाका) दि.26 : आज गडचिरोली जिल्हयात 478 कोरोना तपासण्यांपैकी कोरोनाबाधित व कोरोनामुक्त  संख्या निरंक आहे.  यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30802 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30051 आहे. तसेच सद्या 4 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. 

**

Share

Other News