महाविकास आघाडीतर्फे मनपा निवडणुक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/12/2025 8:55 PM

सांगली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये उमेदवारांची पक्षनिष्ठा, जनसंपर्क, सामाजिक कार्याचा अनुभव, स्थानिक प्रश्नांची जाण तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाबाबतची दृष्टी यांचा सखोल आढावा घेतला गेला.

ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, सांगलीकरांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठीची आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन भाजप-महायुतीला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. सर्वसमावेशक विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेला न्याय देणारी महापालिका साकारली जावी यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे.

याप्रसंगी माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब, माजी मंत्री आ. जयंतरावजी पाटील, राजेश नाईक, मंगेश चव्हाण, शेखर माने, सिकंदर जमादार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या