गडचिरोली जिल्हयात आज तब्बल 73 कोरोनामुक्त, नवीन 156 कोरोनाबाधित

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 17/01/2022 5:48 PM



तर कोरोनामूळे एका हृदयरोग बाधितासह ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

*गडचिरोली,(जिमाका)दि.17*: आज गडचिरोली जिल्हयात 519 कोरोना तपासण्यांपैकी 156 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 73 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 31777 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30346 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 680 झाली आहे. दोन मृत्यूमध्ये चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील 70 वर्षीय पुरुष तसेच गडचिरोली तालुक्यातील 50 वर्षीय हृदयरोगाने बाधित पुरुषाचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 751 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.50 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.14 टक्के तर मृत्यू दर 2.36 टक्के झाला आहे. 

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 73, अहेरी तालुक्यातील 60, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 03, मुलचेरा तालुक्यातील 02, सिरोंचा तालुक्यातील 03, आणि वडसा तालुक्यातील 12 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 73 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 50,आरमोरी तालुक्यातील 04,भामरागड तालुक्यातील 01,चामोर्शी तालुक्यातील 09,धानोरा तालुक्यातील 02,एटापल्ली तालुक्यातील 05,सिरोंचा तालुक्यातील 01,आणि वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.
****

Share

Other News

ताज्या बातम्या