देवणी...प्रतिनिधी
धनेगाव/जवळगा : श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धनेगाव येथील माजी विद्यार्थी प्रणव पांडुरंग बोडके, रा. धनगरवाडी (जवळगा) यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (जि. सांगली) येथे MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
प्रणव बोडके यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धनेगावच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणाच्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून आपल्या कुटुंबासह विद्यालयाचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
त्यांच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थी व पालकांना निश्चितच प्रेरणा मिळणार असून, प्रणव यांनी आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीतही अशीच मेहनत, जिद्द आणि सातत्य कायम ठेवून वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग प्रगती करावी, तसेच समाजाची सेवा करण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडावे, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
शुभेच्छूक :
माजी सरपंच तथा माजी प्राचार्य डॉ. रामलिंग मुळे जवळगेकर
तसेच श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धनेगाव येथील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, स्टाफ व पालकवर्ग.
💐 प्रणव पांडुरंग बोडके यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐