*म्हैसूर–अजमेर विशेष गाडी आता १६२८१/१६२८२ क्रमांकाने नियमित साप्ताहिक एक्सप्रेसने धावणार*
मिरज : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी असून, आतापर्यंत ०६२८१/०६२८२ म्हैसूर–अजमेर–म्हैसूर स्पेशल म्हणून चालविण्यात येणाऱ्या गाडीचे आता १६२८१/१६२८२ म्हैसूर–अजमेर–म्हैसूर साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून नियमितीकरण करण्यात आले आहे.
रेल्वे बोर्डाने या गाडीच्या नियमितीकरणास मंजुरी दिल्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी मुख्यालयाकडून २ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
नियमित सेवेनुसार गाडी क्रमांक १६२८१ म्हैसूर–अजमेर एक्सप्रेस शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ पासून, तर गाडी क्रमांक १६२८२ अजमेर–म्हैसूर एक्सप्रेस सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ पासून धावणार आहे.
या गाडीला मिरज जंक्शन, सांगली, कराड, सातारा, पुणे यांसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
मिरज जंक्शनवरील वेळापत्रक
गाडी क्रमांक मार्ग मिरज आगमन मिरज प्रस्थान वार
१६२८१ म्हैसूर → अजमेर रात्री २:४० रात्री २:४५ रविवार
१६२८२ अजमेर → म्हैसूर रात्री ११:५५ रात्री १२:०५ बुधवार
सध्याच्या उपलब्ध वेळापत्रकानुसार १६२८१ गाडी मिरज येथे २:४० वाजता येऊन २:४५ वाजता सुटते, तर १६२८२ गाडी मिरज येथे रात्री ११:५५ वाजता येऊन मध्यरात्री १२:०५ वाजता सुटते.
गाडीची संरचना : ४ जनरल, २ एसी २ टिअर, ७ स्लीपर, २ एसी-३ टियर, १ फर्स्ट एसी कम सेकंड एसी आणि २ एसएलआर/डी अशा एकूण १८ डब्यांची ही गाडी असेल.
म्हैसूर, हुबळी, बेळगावी, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम मार्गे ही गाडी अजमेरपर्यंत धावणार आहे.
विशेष म्हणजे स्पेशल गाडीला आकारण्यात येणाऱ्या विशेष भाड्याऐवजी नियमित एक्सप्रेस म्हणून सेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.अशी माहीती मध्य रेल्वे प्रादेशिक रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दिली.