ग्रॅन्ड सेल्युट कर्तव्यपूर्तीला , त्याच्यातील कामाप्रती असलेल्या निष्ठेला....!!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/05/2022 11:37 AM

    काल सायंकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सुरुवातीला खिडकीतून पाऊस न्याहळणारे आपण आता दरवाजे बंद करून घरात सुरक्षित आहोत. अशातच
आज भल्या सकाळी या व्यक्तीने मला अस्वस्थ केले....प्रेरणाही दिली आणि मनातून मी या कर्तव्याला सॅल्युटही केला... कर्तव्य बजावण्याचे यापेक्षा वेगळे उदाहरण काय असू शकते?  कुपवाड येथील श्री. अनिल कांबळे हा रोजंदारी वरचा आपल्या महापालिकेच्या कचरा गाडी वर काम करणारा कार्यकर्ता.. त्यांच्या या कामानिमित्ताने ते  अधुन-मधुन दिसतातच. पण आज जे दिसला तो थोडा वेगळा दिसले - भासले.  तुफान पाऊस पडतोय आणि  या भर पावसात आपले  कर्तव्य बजावण्यासाठी भिजत आपलं नेहमीच कचरा गोळा करण्याचे काम अत्यंत इमानेइतबारे करताहेत..
ही अशी माणसं राबतात ... कष्ट उपसतात म्हणूनच आपल्यासाठी काही  आनंदी आणि सुखाचे क्षण येतात .. त्यानाही शक्य होतं पावसाच्या नावाखाली काम टाळणं..पण त्यांनी ते केलं नाही आणि आपल्या कर्तव्य पूर्तीसाठी सरसावलेत. त्यांच्या या कर्तव्याला सॅल्युट..
त्यांच्यासाठी  आपणही एक छोटी गोष्ट करूया ..त्यांना आपल्या घरातला कचरा देताना तो व्यवस्थित पणे देऊ . त्यांच्या गाडीवर सूचना लिहिल्याप्रमाणे सुका कचरा - ओला कचरा वेगळा करून देऊ.  कधी मन द्रवलेच  तरी  पाण्याचा ग्लास ,  कधीतरी चहा त्यांनाही विचारूया . ही अगदी छोटी गोष्ट आहे...आपापल्या परीने करूया.

 धन्यवाद.
मंदार बन्ने
दक्षिण उल्हासनगर
कुपवाड सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या