ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*आजादी का अमृत महोत्सवानिमित्य नगरपंचायत कोरची तर्फे आजादी दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/14/2022 2:41:50 PM

*कोरची - आशिष अग्रवाल*
                   आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आज नगरपंचायत कोरची तर्फे आजादी दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपंचायत कोरची तर्फे 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. 14 ऑगस्टला सकाळी नऊ वाजता बस स्थानक कोरची येथून आजादी की दौड या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोरची नगरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला 14 ऑगस्ट ला सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली झाली होती परंतु पावसामध्ये भिजत नागरिकांनी या स्पर्धेचे मनसोक्तपणे आनंद लुटले. या आजादी दौड मध्ये पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची सुद्धा उपस्थिती होती सदर स्पर्धा ही अंदाजे चार किलोमीटरच्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. नगरपंचायत कोरची तर्फे प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट चे वितरण करण्यात आले. आजादी दौड़ ची सुरुवात नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे यांनी हिरवी झेंडी दाखउन केली. या स्पर्धेमध्ये नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे, नगर उपाध्यक्ष हिरा राऊत, नगरसेवक मनोज अग्रवाल, पाणी पूरवठा सभापती धर्मा नैताम, महिला व बाल कल्याण सभापती भगवती सोनार, नगरसेवक धनराज मडावी, नगरसेवक दिलीप मडावी, नगरसेविका कौसल्या केवास, नगरसेविका दुर्गा मड़ावी, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक नाणेकर, नगरपंचायत उपमुख्याधिकारी बाबासो हाके, नगरपंचायत लेखापाल सुदीप ढोले तसेच नगरपंचायत चे कर्मचारी, पोलिस विभागाचे कर्मचारी व गावातील नागरिक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.  सहभागी स्पर्धकांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

Share

Other News