प्राण्यांवर प्रेम करा: - डॉ कल्पना गायकवाड

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 01/10/2023 10:39 AM


( शारदा विद्यालय येथे प्रतिपादन )

तुमसर: - प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा राज्यात 1960 पासून लागू करण्यात आला आहे.या कायद्यान्वये कोणत्याही प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या प्राण्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याबाबत उपाययोजना करणे व त्यांना अनावश्यक वेदना अथवा त्रास होणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. तेंव्हा प्राण्यांवर प्रेम करा व त्यांचे संवर्धन करा,असे प्रतिपादन डॉ कल्पना गायकवाड यांनी केले.ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ विद्यालय तुमसर येथे  "प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा " या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानी प्र.मुख्याध्यापक राहुल डोंगरे होते.
प्राण्यांना चाबकाने,काठीने अथवा कोणत्याही प्रकारे मारहाण करने,त्याला होणाऱ्या वेदनेस कारणीभुत असणे,आजारी,जखमी किंवा वेदनाग्रस्त प्राण्यांना कामाला जुंपने,प्राण्यांना जाणूनबुजून व विनाकारण अनावश्यक हानिकारक औषधी किंवा वस्तू खाऊ घालणे हा गुन्हा आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी प्राण्यांचा वापर करणे, प्राण्यांचा जुगारासाठी,झुंजी लावण्यासाठी वापर करणे प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्यान्वये असे करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.विद्यार्थी मित्रांनो,समाजात  जाणीव जागृती करण्यासाठी आपण सुद्धा खारीचा वाटा उचलावा व प्राण्यांवर प्रेम करावे असा हितोपदेश केला.निसर्गाचे समतोल राखायचे असेल तर प्राण्यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. दिवसेंदिवस पशू - पक्षी,प्राण्यांची संख्या दुर्मिळ होत आहे.येणाऱ्या भावी पिढीला चित्राच्या द्वारे पशू,पक्षी,प्राणी दाखविण्याची वेळ येवू नये,यासाठी प्रत्येक भारतीयाने पर्यावरणाचे संरक्षण,प्राण्यांचे संरक्षण, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे व आदर्श पिढी घडविण्यासाठी रचनात्मक कार्य करणे प्रत्येकांची नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्र.मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी अध्यक्ष पदावरून केले.कार्यक्रमाचे संचालन कु.प्रीती भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रूपा रामटेके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्योती बावनकर,वासू चरडे,दिपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर,प्रा.नवीन मलेवार , रुपराम हरडे,अशोक खंगार,नितुवर्षा घटारे,विद्या मस्के,सीमा मेश्राम,नलिनी देशमुख,सुकांक्षा भुरे,अंकलेश तिजारे,प्रशांत जीवतोडे,दिपक बालपांडे,नारायण मोहनकर, झंकेश्वरी सोनवणे आदीनी सहकार्य केले.

Share

Other News

ताज्या बातम्या