कत्तलखान्यासमोर भटक्या कुत्र्यांच्या झुंडी, नागरिकांच्या जीवास मोठा धोका, येत्या २४ तासांत बंदोबस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरू : मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/01/2026 1:31 PM

सांगलीतील डॉ. पी. आर. पाटील मार्ग आणि कत्तलखान्यासमोर सध्या भटक्या कुत्र्यांचा जो हैदोस सुरू आहे, तो अत्यंत चिंताजनक असून यामुळे सामान्य सांगलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कत्तलखान्यासमोर जमा होणाऱ्या कुत्र्यांच्या या झुंडीमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होत असून, पालिकेची 'डॉग व्हॅन' नक्की कुठे गायब आहे, असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. अशा प्रकारे प्रशासन सुस्त राहिल्याने सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली वावरत असून, मी प्रशासनाला कडक शब्दांत इशारा देतो की यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी. जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार कारभाराचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि येत्या २४ तासांत ठोस कारवाई न झाल्यास जनतेच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू! 


मनोज भिसे, अध्यक्ष:- लोकहित  मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या