सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभाची भव्य जाहीर सभा घेण्यात आली.
सांगली महानगरपालिकेत सुशासन, पारदर्शकता आणि सांगली शहराच्या उज्वल भविष्यासाठी करण्यासाठी दृढ संकल्प करून आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करून महानगरपालिकेत आपली एक हाती सत्ता द्यावी अशी आव्हान केली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सत्यजितभाऊ देशमुख, आमदार अतुल बाबा भोसले, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार नितीनराजे शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, नीताताई केळकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी सर्व भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार, जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते तसेच समस्त सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.