डिजिटल माध्यमांतून मतदान जनजागृतीवर महापालिकेचा भर : मतदार जागृतीसाठी मोबाईल व्हॅनचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/01/2026 8:39 PM

नांदेड :- लोकशाहीची खरी ताकद ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते.मतदान हा केवळ हक्क नसून लोकशाहीप्रती आपले कर्तव्य आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून त्याच्या माध्यमातून नागरिक आपल्या शहराच्या आणि प्रशासनाच्या भवितव्याची दिशा ठरवतात. त्यामुळे कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन *जिल्हाधिकारी राहुल कर्डीले* यांनी केले.महापालिकेच्या वतीने पालिकेच्या विसावा उद्यानामध्ये मतदार जागृतीसाठी मोबाईल व्हॅनचे उदघाटन *जिल्हाधिकारी राहुल कर्डीले* यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* म्हणाले, ‘मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली चित्रफित या मोबाईल फिरते वाहनाव्दारे नागरिकांपर्यंत सोप्या, प्रभावी आणि भावनिक पातळीवर पोहोचणारे माध्यम ठरेल. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदान करणारे मतदार यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यावर महापालिकेचा भर राहील. या फिरत्या वाहनांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल,’ असा विश्वासही यावेळी मनपा आयुक्तांनी व्यक्त केला.

पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असुन महापालिका मुख्यालयात तसचे शहरातील विविध चौकात व महत्वाच्या ठिकाणी मतदार सेल्फी पाईंटची निर्मिती सुध्दा करण्यात आल्याचे यावेळी पालिका आयुक्तांनी सांगितले.याप्रसंगी उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त नितीन गाढवे, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे,जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, भांडारपाल नागनाथ पतंगे, वरीष्ठ लिपीक गिरीश काठीकर, साईराज मुदीराज, आल्लाम इकबाल व शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या