लंगर साहेब गुरुव्दारा, नांदेड येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीसांनी तात्काळ कार्यवाही करुन आरोपींना केली अटक

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/01/2026 9:41 PM

नांदेड :- दिनांक 03.01.2026 रोजी सायंकाळी 05.30 वा. चे सुमारास लंगर साहब गुरुव्दारा नगीनाघाट, नांदेड समोर सार्वजनिक रोडवर दोन गटात हाणामारी होत आहे व गोळीबार झाला आहे अशी माहिती मिळाल्याने व घटनेचे गार्भीर्य लक्षात घेवून मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री रामेश्वर व्यंजने, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड (शहर), मा. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, मा. परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड व स्टॉफ असे घटेनच्या ठिकाणी तात्काळ रवाना झाले सदर ठिकाणी जावून परिस्थीती तात्काळ नियंत्रणात आणली. त्यानंतर मा. श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर घटनेमधील आरोपींचा शोध घेणे बाबत वेगवेगळे पथके तयार करुन आरोपी शोध कामी रवाना केले.

सदर घटनेमध्ये एका गटातर्फे फिर्यादी नामे कमलप्रितसिंग पि. अमरजितसिंग सिंधु वय 33 वर्षे व्यवसाय हॉटेल चालक रा. अबचलनगर, नांदेड यांनी फिर्याद दिली की दिनांक 03.01.2026 रोजी सायंकाळी 05.35 वा. चे सुमारास ते त्यांचे हॉटेल मध्ये असताना हॉटेल समोर मनज्योतसिंग शेट्टी व परमजितसिंघ चावला यांचे सोबत काही यात्रेकरु हे वाद करत असताना फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचे एका यात्रेकरुने त्याचे जवळील पिस्टल काढुन फिर्यादीचे दिशेने रोखुन जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्टल मधुन फायर करुन फिर्यादीचे मांडीवर गोळी मारुन गंभीर जखमी केले व दुसरे यात्रेकरुने परमजितसिंघ यांचे डोक्यात लाठी मारुन जखमी केले वगैरे फिर्यादी वरुन पोस्टे वजिराबाद गुरनं. 109(1),118(1),3(5) बीएनएस सह कलम 3/25,7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 04/2026 कलम

तसेच दुस-या गटातर्फे फिर्यादी नामे लवप्रितसिंग बलविरसिंग चहल वय 21 वर्षे रा. मकु, फिरोजपुर राज्य पंजाब यांनी फिर्याद दिली की, दिनांक 03.01.2026 रोजी सायंकाळी 05.30 वा. चे सुमारास लंगर साहब गुरुव्दारा, नांदेड येथे दिनांक 02.01.2026 रोजी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून नांदेड येथील 1. कमलप्रित सिंग 2. परमजितसिंग चावला 3. कुनाल नंबरदार 4. बलप्रितसिंग चावला 5. मनजोतसिंग 6. गोपी यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर तलवारीने, काठीने वार करुन जिवे 06/2026 कलम मारण्याचा प्रयत्न केला वगैरे फिर्यादी वरुन पोस्टे वजिराबाद गुरनं 109(1),189(2),189(4),191(2),191(3),190,118(1),352,351 (2) बीएनएस सह कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. असे दोन गुन्हे परस्पर विरोधी (क्रॉस) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यानुसार मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पाच पथका पैकी एक पथक पंजाब येथे आरोपींच्या मागावर रवाना केले. गुन्हयाचे तपासात वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळाचे परिसरातील CCTV फुटेज तपासणी केले, तांत्रीक तपास तसेच सायबर सेलची मदत घेण्यात आली व NatGrid डीटेल्स् तपासण्यात आले. आरोपीचा शोध घेणे करणे करीता इतर चार टिम हया तपास कामी अकोला, अर्धापूर, बिदर व शेजारील राज्यात गुन्हयाचे अनुषंगाने रवाना करण्यात आल्या. घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र व शेजारील राज्यात ठिक ठिकाणी नाकाबंदी लावण्यासंदर्भात वायरलेस मेसेज पाठविण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे ।। आरोपी निष्पन्न करुन गुरनं. 04/2026 मध्ये 02 आरोपीतांना नांदेड येथुन व 05 आरोपीतांना काल रात्री अकोला, बुलढाणा व नांदेड पोलीस यांनी समन्वयाने रोडवरती काही किलो मीटर पाठलाग करुन ताब्यात घेतले असे एकुण 07 आरोर्पीवर अटकेची कार्यवाही सुरु आहे. सदर गुन्हयातील आरोपी हे मुळचे मकु फिरोजपुर राज्य पंजाब येथील रहिवासी आहेत. व गुरनं 06/2026 मधील 03 आरोर्षीवर अटकेची कार्यवाही सुरु आहे. गुहयाचा अधिक तपास सपोनि/उमाकांत पुणे, पोस्टे वजिराबाद हे करीत आहेत.

मा. श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली गोळीबार करणारे आरोपी 24 तासात निष्पन्न करुन एकुण दहा आरोपींवर अटकेची कार्यवाही चालू आहे. सदरची कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या