महापालिकेच्यावतीने साविञीबाई फुले यांना अभिवादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/01/2026 8:41 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता *स्त्री मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या साविञीबाई फुले* यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळील (आयटीआय) येथील पुतळ्यास  *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या, ज्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि समाज सुधारणेसाठी कार्य केले. त्यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, अंधश्रद्धा, बालविवाह यांसारख्या कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला आणि विधवा पुनर्विवाह व आंतरजातीय विवाहांना पाठिंबा दिला, ज्यामुळे त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हटले जाते. 

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम, अतिरिक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.फरहतुल्ला बेग, क्रिडा अधिकारी रमेश चवरे,शिक्षणधिकारी नागराज बनसोडे,क्षेत्रिय आधिकारी निलावती डावरे,अग्निशमन अधिकारी के.जी. दासरे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, वरिष्ठ लिपीक साईराज मुदीराज,साहेबराव ढगे, शुभांगी चौधरी, उल्हास महाबळे यांच्यासह मनपाचे इतर कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या