* क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन *

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 04/01/2026 11:37 AM



* क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल - मुख्यमंत्री *

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा, दि. : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे उभ्या राहणारे उचित स्मारक हे त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकारिता देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या १४३ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात आण विदेशात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, स्त्रीयांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य समजतो, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट रुढीवादाच्या विरोधात क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि समाजामध्ये समता तयार करण्याकरता एक मोठी व्यवस्था उभी केली.



Share

Other News

ताज्या बातम्या