पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य रश्मि शुक्ला यांच्या उपस्थितीत पार पडला रोजगार व स्वंयरोजगार मेळावा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 18/02/2024 9:14 PM

 
 
पोलीस महासंचालक यांचे हस्ते स्किलिंग इन्स्टिटयुट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अत्याधुनिक संगणक कक्षाचे उदघाटन 
. मेळाव्यात 600 हुन अधिक युवक-युवतींची उपस्थिती
. प्रोजेक्ट प्रयास अतंर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार-23,645 विदयाथ्र्यांनी दिली होती परिक्षा.        महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक  रश्मि  शुक्ला यांनी दिनांक 17/02/2024 ते 18/02/2024 अश्या दोन दिवसाकरिता  गडचिरोली जिल्हयाला भेट दिली. गडचिरोली जिल्हयातील गरजु व सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र (स्किलिंग इन्स्टिटयुट) ची सुरुवात करण्यात आली आहे.यातुनच अत्याधुनिक कोर्सेसचे प्रशिक्षण देता यावे याकरीता आज दिनांक 18/02/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस महासंचालक  रश्मि शुक्ला  यांचे हस्ते व आयुक्त,राज्य गुप्तवार्ता विभाग,म.रा.मंुबई शिरीष जैन,विशेष पोलीस महानिरीक्षक,नक्षलविरोधी अभियान नागपूर, संदीप पाटील,पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक,विशेष कृती दल,नागपुर डॉ.संदिप पखाले यांच्या प्रमुख उपस्थितीत “स्किलिंग इन्स्टिटयुट अंतर्गत संगणक कक्षाचे उदघाटन” करण्यात आले.                                                                                                                                             
तसेच गडचिरोली जिल्यातील युवक युवतींकरिता  पोलीस महासंचालक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालय येथील एकलव्य धाम येथे रोजगार व स्वंयरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्रातील विविध ठिकाणाहुन दुर्गम-अतिदुर्गम भागातील 600 हुन अधीक युवक –युवती उपस्थितीत होते. स्किलिंगइन्स्टिटयुट पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली मार्फत पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण 150 युवती, वाहन चालक प्रशिक्षणाकरिता 130 युवती, वाजंत्री प्रशिक्षण 10 गट,एम.एस.-सी.आय.टी. प्रशिक्षण 100 विदयार्थी,वेब डेव्हलपर,सॉफटवेअर डेव्हलपर,मीडीया डेव्हलपर या कोर्सचे 150 प्रशिक्षणार्थी,सुरक्षा रक्षक प्रशिक्षण 60 विदयार्थी,शिवणकाम प्रशिक्षण 35 युवती,ब्युटी पार्लर प्रशिक्षण 25 युवती,तसेच प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंत विदयार्थी व समन्वयक शिक्षक,दिव्यांग बंाधव,तसेच बीओआय स्टार आरसेटी, गडचिरोली यांचे मार्फतीने प्रशिक्षण घेत असलेले सी.सी.टी.व्ही. प्रशिक्षण 35 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.    रोजगार मेळाव्यात उपस्थित विविध प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना एम. एस. सि. आय. टी. प्रमाणपत्र, सि. सि. टी. व्ही. प्रमाणपत्र, , वाहन चालक प्रशिक्षणाथ्र्यांना लायसन्स, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणाथ्र्यांना किट साहित्य, शिवण काम प्रशिक्षणाथ्र्यांना  शिवणयंत्र,ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना ब्युटी पार्लर चेअर,दिव्यांगाना व्हिलचेअर,वादयवादक समुहास वाजंत्री साहित्य वाटप करण्यात आले तसेच प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंतांना पोलीस महासंचालक  रश्मि शुक्ला  यांचे हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षिस देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना  पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि श्ुक्ला साो. यांनी सांगितले की,तुम्ही चांगले शिक्षण घेतले तर तुमचा परिवार त्यातुन समाज आणि पर्यायाने देश उन्नत होणार आहे. तुम्हाला जे बनायचे आहे तुमचे जे ध्येय आहे ते पुर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. तुमच्या पंखांना शिक्षणाचे बळ घेवुन सक्षम व्हा आणि उंच उडान करा. कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रास्ताविक करतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली पोलीस दल राबवित असलेल्या विविध कल्याणकारी उपक्रम व 10,400 हुन अधीक युवक युवतींना दिलेल्या रोजगार व स्वंयरोजगार बाबत माहिती दिली. 
सदर कार्यक्रमास  आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा. मंुबई श्री. शिरीष जैन,  विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर,  संदिप पाटील.,  पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल.,  पोलीस अधीक्षक  नीलोत्पल , पोलीस अधीक्षक, विशेष कृती दल नागपुर, डॉ. सदिप पखाले अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश  हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. भारत निकाळजे, पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या