गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार समिती यांचे मार्फत दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, चित्रपट, शिक्षण, सामाजिक व राजकीय या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंचा सन्मान करणेत आला. यावेळी नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या संचालिका व अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन सुरज उपाध्ये मॅडम यांना त्यांच्या शैक्षणिक व मुख्याध्यापिका म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेवून केंद्रिय मंत्री व उपस्थित प्रतिष्ठित मान्यवर यांच्या शुभहस्ते आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित व गौरविण्यात आले.
त्या मागील 10 वर्षापासून कुपवाड येथील अकुज् इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शाळेमध्ये त्यांनी डिजीट्ल शिक्षण प्रणाली, जीवन कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, इंडस्ट्रीयल भेटी, स्कॉलरशिप, नासो व ऑलिम्पियाड परीक्षा, शिक्षक प्रशिक्ष्ण हे शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रम राबवून विद्यार्थी व शिक्षक यांच्या सर्वागिंण विकासासाठी त्या प्रयत्नशील आहेत. या सर्व कार्याची दखल घेवून त्यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करणेत आले. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतूक होत आहे.