📢 लोकहित मंच, सांगलीची महत्त्वाची मागणी!
📍 स्थान: सांगली स्टेशन रोड, एस एफ सी मेगा मॉलसमोर
सांगली स्टेशन रोडवरील एस एफ सी मेगा मॉलसमोर गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साचला असून, त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, परंतु सांगली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे अद्याप दुर्लक्ष केले आहे.
➡ संबंधित प्रभागातील मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक यांना ही परिस्थिती दिसत नाही का?
➡ महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने इतक्या दिवसांपासून हा कचरा का उचललेला नाही?
➡ नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केली जात आहे का?
‼ लोकहित मंच, सांगली महानगरपालिकेकडे ठाम मागणी करते की, त्वरित हा कचरा उचलण्यात यावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा!
✍ - मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली