कुपवाड येथील वृद्धसेवा आश्रमास उपमहापौर गजानन मगदूम यांची भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/03/2026 12:07 PM

कुपवाड येथे वृद्ध सेवा आश्रम सांगली या नामवंत व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संस्थेस आज उपमहापौर गजानन मगदूम यांच्याकडून भेट देण्यात आली.
स्वर्गीय माजी आमदार शरद पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही संस्था आज भारतातील एक आदर्श वृद्ध सेवाश्रम म्हणून ओळखली जाते. कुपवाड शहराचे नाव देश-विदेशात पोहोचविण्याचे मोलाचे कार्य या संस्थेमुळे घडले आहे. येथे निराधार व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा, निवारा व विविध उपक्रमांद्वारे आधार दिला जातो.
संस्थेचे संस्थापक जोसेफ फर्नांडिस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच  उपमहापौर म्हणून निवड झाल्याबद्दल माझा व सरपंच सुधाकर गायकवाड सर यांचा संस्थेमार्फत यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरोजिनी नायडू (स्व. शरद पाटील सर यांच्या कन्या), रेव्ह. काळे सर, दादासो पाटील, मुबारक संनदी, महावीर सौंदती सर, अहिंसक धोत्रे तसेच संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या