सांगलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न आता तरी सुटणार का? : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/03/2026 12:23 PM

​मागील अनेक दिवसांपासून सांगलीकर नागरिक स्वच्छ आणि शुद्ध पाण्यासाठी आस लावून बसले आहेत. पाणी हे जीवन आहे, पण जेव्हा हेच पाणी दूषित स्वरूपात घराघरांत पोहोचते, तेव्हा सामान्यांच्या आरोग्याचं काय?
​नामदार चंद्रकांत (दादा) पाटील साहेब,
सांगलीकरांच्या आशा आता तुमच्यावर टिकून आहेत. "सांगलीकरांना स्वच्छ पाणी कधी मिळणार?" हा प्रश्न आज प्रत्येक घरातून विचारला जात आहे. प्रशासकीय अडथळे दूर करून, राजकारणापलीकडे जाऊन आमच्या माता-भगिनींना आणि लहान मुलांना शुद्ध पाणी मिळावे, हीच आमची कळकळीची विनंती आहे.
​लोकहित मंचच्या माध्यमातून आम्ही जनतेचा हा आक्रोश आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. साहेब, आपल्या शब्दावर आणि कामावर आमचा विश्वास आहे. सांगलीकरांची ही तहान आता लवकरच 'शुद्ध' होईल, अशी अपेक्षा करतो.

*​मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या