महानगरपालिकेतर्फे गुरुद्वारा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/03/2026 8:40 PM

नांदेड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नांदेड शहराला कचरामुक्त आणि सुंदर करण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज श्री सचखंड गुरुद्वारा आणि लगतच्या परिसरात *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *उपमहापौर दीपकसिंग रावत* यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी महापौर आणि उपमहापौरांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. परिसरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच 'घंटागाडी' द्वारे कचरा उचलण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि परिसरातील सांडपाणी तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या मोहिमेदरम्यान एकल वापर प्लास्टिकच्या (Single-use plastic) वापरावर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना महापौर कविता मुळे म्हणाल्या की, "नांदेड हे पवित्र शहर असून याची स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मध्ये आपल्या शहराचा गौरव वाढवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे". या मोहिमेत महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, नगरसेवक तुलजाराम यादव, सुमित मुथा, धिरज यादव ठाकुर, कुंजीवाले, अमृताबाई बजरंगसिंह ठाकुर, महेंद्रसिंग लांगरी, बजरंग यादव, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक वासिम तडवी, स्वच्छता अधिकारी बालाजी देसाई, स्वच्छता निरीक्षक आणि मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या