सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह पंचक्रोशीतील अनेक समस्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, वेगवेगळ्या सरकारी विभागातील अधिकाऱ्यांची अरेरावी, यासंदर्भात कायमच आवाज उठवणाऱ्या लोकहित मंचच्या या कार्याचे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय नामदार संजय सावकारे यांनी कौतुक करत, लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
ते आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मनोज भिसे यांनी त्यांची भेट घेतली असता, इथून पुढच्या काळातही अशा तऱ्हेचे समाज उपयोगी काम आणि सर्वसामान्य नागरिकांची सेवा लोकहित मंचच्या माध्यमातून घडत राहो. अशा शुभेच्छा दिल्या....