सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक सोयी सुविधांचा बोजवारा उठला असून प्रशासनातील अधिकारी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिकांकडून येत आहेत.
मोकाट जनावरे मोकाट कुत्री यांच्याकडून सर्वसामान्य माणसांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोकाट कुत्र्यांनी अनेक लहान बालकांसह ज्येष्ठ नागरिकांवर जीव घेणे हल्ले केल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत तरीही महानगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही. महानगरपालिका हद्दीमधील रस्ते खराब झाले असून याकडेही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे अनेक ठिकाणी रस्त्यांना भली मोठी भगदाडे पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून हे रस्ते तयार करण्यात आले मात्र हे तयार करत असताना ते कशा पद्धतीने तयार करण्यात आले हेही पाहणे गरजेचे आहे. महानगरपालिकेचे ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक कारभार करत आहेत. याची नुकतीच घडलेली घटना म्हणजे एका ठेकेदाराने नगररचना अधिकाऱ्याची डुप्लिकेट सही करून सदर बिलांची फाईल पास करण्यासाठी पाठवल्याची घटना.
शिवाय अपालिका क्षेत्रातील विस्तारित भागांमध्ये पाणी गटारी कचरा गाड्या स्वच्छता याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. परवाच पडलेल्या पावसामुळे आनंदनगर मधील गल्ली नंबर 3 मध्ये नागरिकांच्या घरामध्ये गटारांचे पाणी शिरल्याची घटना घडली होती. याकडेही आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. तर महापालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या मोकळ्या प्लॉटमध्ये झाडे झुडपे वाढवून पावसाचे पाणी साठून राहिल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे आणि या प्लॉटमध्ये सापांचेही प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि जीव दोन्हीही धोक्यात आले आहे.
महानगरपालिका शाळांची ही दुरावस्था झाली असून या शाळांमध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे.
महानगरपालिकेमध्ये काम करत असलेले रोजंदारी आणि बदली कामगार यांचेही अनेक प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण याकडे गांभीर्यपूर्ण आणि जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत आपला वचक महानगरपालिका प्रशासनावर बसण्यासाठी दर महिन्याला महापालिकेत आपण आढावा बैठकीचे आयोजन करावे आणि सर्वसामान्य माणसांच्या ही समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने आपणाकडे करत आहोत.
मनोज भिसे--अध्यक्ष लोकहित मंच सांगली