भगूर ता. नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर व धरती आबा जनभागीदारी शिबिर
भगूर : छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व समाधान शिबिर व धरती आबा योजना अंतर्गत नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प भगूर येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीयस्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व तक्रारी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळस्तरावर शिबिर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना उत्पन्न व विविध दाखले, शेतकरी दाखले, शिधापत्रिकासंबंधित कामे आदी महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसंबंधी मार्गदर्शन व निराकरण करणे हा या अभियानाचा हेतू आहे. पुढील शिबिराचा लाभघेण्याचे आवाहन तहसीलदार श्रीमती. शोभा पुजारी यांनी केले आहे.
यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रीमती सुनिता पाटील, नायब तहसीलदार शितलकुमार साळवे, श्री. आदिनाथ मेंदडे, मंडळ अधिकारी पाबळे, तलाठी ,दिपाली धनगर व नूतन विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री सानप सर उपमुख्याध्यापक श्री कवडे सर सचिन झुटे तुषार कुंडारिया व विविध विभागांचे अधिकारी व सेतू, आधार कार्ड चालक उपस्थित होते.