*ति.झं. विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 16/06/2025 3:53 PM

*ति.झं. विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न*

भगूर.           येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित ति.झं. विद्यामंदिर,भगूर शैक्षणिक वर्ष 2025- 26 चा शाळा प्रवेशोत्सव समारंभ अतिशय आनंददायी, प्रसन्न व उत्साही वातावरणात संपन्न झाला. 
 विद्यार्थ्यांचे शालेय विद्यार्थी वाद्यवृंद यांनी ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेशद्वारात स्वागत केले. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. 
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत        पाठ्यपुस्तके, वही, पेन ही शैक्षणिक साहित्य देण्यात आली. 
 यावेळी Pedal To Success एनजीओ तर्फे ग्रामीण भागातून येणाऱ्या व शाळा परिसरातील बाहेरून येणाऱ्या विद्यार्थिनींना शालेय सायकल बँकेच्या माध्यमातून सायकल वितरण करण्यात आले. 
त्यानंतर सभागृहात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गीत व आनंददायी गीतांच्या माध्यमातून  करण्यात आले.
 'एक पेड मा के नाम' अंतर्गत शालेय राष्ट्रीय हरित सेना, एनसीसी स्काऊट गाईड व इको क्लब या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय परिसरात ठेवण्यासाठी व एक झाड कुंडीत लावण्यासाठी शाळेतर्फे कुंड्या देण्यात आल्या. तसेच आजच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड उपलब्ध असलेल्या जागेत लावावे. जर जागा उपलब्ध नसेल कुंडीत झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. 
यावेळी शालेय परिसरात, रांगोळ्या फलक लेखन, रंगीत ध्वज व सुमधुर गीते लावण्यात येऊन वातावरण निर्मिती करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते माजी विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चेतक बलकवडे,पालक संघ सदस्य भास्कर भदाने, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना आडके,
यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजी सोनवणे, माजी नगराध्यक्ष शाळेच्या माजी विद्यार्थीनी स्वाती झुटे, पालक शिक्षक संघाचे सदस्य  विजय पवार, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा , सौ.रूपाली उचाडे सौ अर्पणा वासले, राजू जाधव. 
आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक हेमंत काशिकर,रविंद्र नाकिल,उषा आव्हाड,माया सिसोदे,विजया चतुर,महेंद्र महाजन,संदीप पाटील,कुंदन गवळी,कैलास टोपले,विलास कडाळे,सुनिल शेटे,चिमा सापटे,दिगंबर माळी
यांनी विशेष प्रयत्न केले

Share

Other News

ताज्या बातम्या