सौ.आशालता अण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड येथे प्रा.पद्माकर जगदाळे सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते नवगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक, सायकल वाटप करण्यात आले.
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड, सौ.आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड येथे प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक तसेच गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप पद्माकर जगदाळे (सर) शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली यांच्या हस्ते नवगतांचे फुलांची उधळण करून स्वागत स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगदाळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवच्या निमित्त मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.आण्णासो उपाध्ये (सर) शाळेची हितचिंतक माननीय अरुण रुपनर (तात्या), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष मा.आशुतोष (भाऊ) धोतरे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सरोदे तसेच शाळेचे मुख्याध्यापक चिरमे सर, कुंदन जमदाडे, अनिल चौगुले, सुशांत पाटील सिद्धार्थ कांबळे इत्यादी शिक्षक, विद्यार्थी व पालक व पालक समितीचे सदस्य इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रिया पाटील व सुचिता पाटील यांनी केले.