प्रभाग क्रमांक 8 मधील खारे मळा अजंठा कॉलनी येथील ड्रेनेज चरी मुजवल्या राष्ट्रवादी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे
कुपवाड मधील प्रभाग क्रमांक आठ मधील खारे मळा, अजंठा कॉलनीतील ड्रेनेज लाईनसाठी रस्ता खोदल्यामुळे अतिशय खराब झाला होता. या भागातील रस्ता अतिशय खराब झाल्याचे भागातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेऊन आशुतोष धोतरे यांनी संबंधित ड्रेनेज अधिकाऱ्यांना तत्काळ मुरूम टाकण्यास सांगितले होते. या मुरूम टाकण्याच्या कामाची त्यांनी नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून मुरूम टाकून दिला.
भागातील रस्त्यावर मुरूम टाकून दिल्यामुळे नागरिकांनी आशुतोष धोतरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड अध्यक्ष यांचे आभार मानले.