स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांचा राजकीय वारसा पुढे नेत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री मदनभाऊ पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. काल विजय बंगला येथे झालेल्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत त्यांना पक्षप्रवेशाचे औपचारिक निमंत्रण देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आज सौ. जयश्री वहिनी यांची विजय बंगला येथे भेट घेत, त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भाजपा शहराध्यक्ष या नात्याने पक्षप्रवेशाच्या या सकारात्मक निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले.
या प्रसंगी माजी नगरसेवक मा. संजय यमगर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मा. भारत खांडेकर, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, कुपवाड मंडल अध्यक्ष मा. कृष्णा राठोड तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. सौ. जयश्री वहिनी यांच्या प्रवेशामुळे सांगलीतील भाजप संघटन अधिक बळकट होणार आहे.
लवकरच हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस भारतीय जनता पक्षाकडून हार्दिक शुभेच्छा...