पुण्यामधील इंद्रायणी पूल पडल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पूलांच्या बाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच सांगली जिल्ह्यामध्ये ही अशी अनेक धोकादायक पूल आहेत ज्यांचे काम नव्याने झाले पाहिजे.
सांगली मिरज रोडवरील रेल्वे पूल हे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असल्याचे गेल्या दोन वर्षांपूर्वीच सांगितले गेले असूनही त्याची केवळ डागडुजी करून हे पूल वापरात आहे. या पुलाला पर्यायी मार्ग काढून सदर पुलाचे काम तातडीने आणि कोणतीही दुर्घटना घडण्याच्या आधी प्रशासनाने सुरू करावे अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत. एखाद्या मोठ्या दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे का? असा सवालही व्यक्त होताना दिसत आहे.
जिल्ह्यामधील अनेक पूल हे अनेक वर्षांपासून पूर झेलत आहेत. शिवाय अनेक पूलांची वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त झाली असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मिरज कोल्हापूर रोडवरील रेल्वे पुलाच्या स्लॅबचा काही भाग काही वर्षांपूर्वी पडलेलाही होता. सध्या या फुलाची अवस्था खिळखिळी झाल्याचे प्रशासनाला दिसत नाही का? लवकरात लवकर अशा डबघाईला आलेल्या पूलांचे काम प्रशासनाने नव्याने करावे आणि संभाव्य दुर्घटना टाळाव्यात. अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने प्रशासनाकडे करत आहोत.
याबाबत योग्य ती पावले लवकरात लवकर उचलावीत अन्यथा लोकहित मंच कडून जोरदार आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद, जिल्हा प्रशासन,सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच रेल्वे प्रशासनानेही घ्यावी.
*मनोज भिसे- अध्यक्ष लोकहित मंच सांगली*