भुसावळ येथील जळगाव रोड वरील गोदावरी नगरातील श्री गणेश महिला मंडळाने पर्यावरण संरक्षण सुचकतेचा संदेश देत आपल्या परिसरातच गणेश विसर्जन टॅंक मध्ये करून नदी स्वच्छतेचा संदेश दिला.
आज सर्वत्र गणेश विसर्जनाची जल्लोषात तयारी असताना गोदावरी नगरातील श्री गणेश महिला मंडळाच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी एकत्रित येत गणेश विसर्जन नदीत न करता आपल्या परिसरातच टँक मध्ये करावे व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्याचा संकल्प केला सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या परिसरात भव्य मिरवणूक काढून दांडिया च्या गजरात गणेश बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला याप्रसंगी परिसरातील सर्व महिला भगिनी, पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.