व्यसनमुक्ती शिवाय सामाजिक प्रगतीचा हेतू साध्य करणे जवळपास अशक्य:- नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 19/12/2025 5:19 PM

व्यसनमुक्ती शिवाय सामाजिक प्रगतीचा हेतू साध्य करणे जवळपास अशक्य:- नाशिकभूषण माननीय अमोलभाऊ भागवत.

नाशिक परिसरातून मोक्ष फाउंडेशन येथे व्यसनमुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली, यावेळी कामगार नेते, नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत, मारवाडी युवा मंच व्हाईट चेअरमन रोशनी राठी, सौंदर्यवती स्पर्धा विजेत्या धनश्री सोनवणे, डॉक्टर पार्वती लकारीया, छावा संघटन नाशिक महिला जिल्हाध्यक्ष दिपाली वाणी, सक्षम समाजसेविका ज्योतीताई परदेशी, जनसेविका रोहिणीताई वाघ, गायिका रेखाताई निकुंभ, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, दिव्यांग जिल्हाध्यक्ष सूरदास पावशे, युवा नेते राहुल मोरे, अमोल लकारिया, श्यामराव डावरे, दिनेश मंडलिक, दीपक झुटे आदी मान्यवर मोक्ष फाउंडेशन मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसह कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. 
सूत्रसंचालन करताना सूरदास पावशे यांनी व्यसनांची गंभीरता स्पष्ट केली, कार्यक्रमाची सुरुवात  गायिका रेखाताई निकुंभ यांच्या "इतनी शक्ती हमे देना दाता" या सुरेल गाण्याने झाली, तसेच मोक्ष फाउंडेशन मध्ये आलेल्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करणाऱ्या तेथील प्रशिक्षक व काउंसलर यांचे अभिनंदन करून त्यांचे सत्कार करण्यात आला. यामध्ये संचालक सॅविओ डिक्रूस, प्रशिक्षक संतोष सरवणकर, जोशी सर, जयेश पाटील व सहकारी यांना सन्मानित केले.
त्यानंतर सक्रिय जनसेविका ज्योतीताई परदेशी यांनी आपल्या मात्यापित्यांकडे लक्ष देऊन आपल्याकरता केलेले समर्पण ओळखून, तरुणांनी व व्यसनी व्यक्तींनी आयुष्यामध्ये यशाचे एक एक टप्पे ओलांडावेत असे आवाहन केले, त्यानंतर मारवाडी युवा मंचच्या उपाध्यक्ष रोशनी राठी यांनी अशा सामाजिक कामांमधून..समाजामध्ये येणाऱ्या एकेक अडचणी आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो व त्याचाच एक भाग व्यसनमुक्ती आहे आणि व्यसनमुक्तीसाठी भविष्यामध्ये मी स्वतः आणि आमची अखिल भारतीय मारवाडी युवा मंच ही संघटना प्रयत्नशील राहील असे सांगितले. मिस व्हियासियस विनर धनश्री सोनवणे यांनी आपणसुद्धा जीवनामध्ये अशा व्याधींवर मात करून अनेक प्रकारचे यश संपादन करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत असे उपस्थितांना प्रेरणादायी वक्तव्य केले. 
त्यानंतर सर्व रुग्ण आणि कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेले मान्यवर ज्यांना ऐकण्यासाठी तिथे आलेले होते, त्या नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी सरळ सरळ मोक्ष फाउंडेशन येथील रुग्णांसह, संपूर्ण महाराष्ट्रातील व्यसनी व्यक्तींना व्यसनांपासून दूर जाण्याचे जाहीर आवाहन केले व या सर्व प्रक्रियेमध्ये ज्याठिकाणी माझी किंवा आमची गरज लागेल, आम्ही सहकार्यासाठी नक्कीच तेथे उभे राहू आणि महाराष्ट्रात टप्प्याटप्याने व्यसनमुक्ती अभियान घेण्यात येईल, जास्तीत जास्त व्यसनांची ग्रासलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे सदर कार्यक्रमाच्या वेळी आश्वासन दिले.
#nashiknewsstarnewsranragininews

Share

Other News

ताज्या बातम्या