नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/12/2025 5:41 PM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा नगरपरिषदेच्या मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा नगरपरिषदेच्या मतदार संघात शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.ही सार्वजनिक सुट्टी धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच या मतदान असलेल्या क्षेत्रातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इ. ना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहिल असे नमूद केले आहे, अशी माहिती जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या