सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आनंद सोनटक्के यांच्या वतीने जेष्ठ नागरिकाना ब्लॅंकेट वाटप

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/12/2025 6:30 PM

नांदेड :- अर्धापूर तालुक्यातील लोणी (बु) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आनंद सोनटक्के यांनी पूर्णा तालुक्यातील श्री. गंगाजी बापू देवस्थान येथील राहणाऱ्या जेष्ठ नागरिकाना दिनांक 19/ डिसेंबर रोजी ब्लॅंकेट वाटप केले.यावेळी उपस्थिती जेष्ठ नागरिकांनी आनंद सोनटक्के यांचे आभार मानले.

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हे दर वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून जेष्ठ नागरिकांची सेवा करतात.पावसाळ्यात छत्री तर हिवाळ्यात ब्लॅंकेट वाटप करत असतात.सध्या थंडी अतिशय प्रमाणात जाणवत असून या थंडीमुळे जेष्ठ नागरिकाना हुडहुडी भरत आहे.पूर्णा तालुक्यातील श्री.संत गंगाजीबापू देवस्थान येथे अनेक जेष्ठ नागरिक मंदिर परिसरात राहतात. त्यानां प्रचंड थंडीचा सामना करावा लागतो.त्यामुळे आनंद सोनटक्के यांनी येथील जेष्ठ नागरिकाना थंडी पासून बचाव व्हावा यासाठी ब्लॅंकेट वाटप केले.आनंद सोनटक्के यांच्या या सामाजिक कार्याचे अनेकांनी कौतुक केले.यावेळी श्रीकांत वाघमारे,रामजी गंगासागरे,गंगाधर सोनटक्के (पत्रकार)बालाजी कनकटे,बजरंग बोबडे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या