अहिल्यानगर, दि. ३० डिसेंबर :- हुतात्मा स्मारकांची नियमित देखभाल व परिरक्षण स्वायत्त संस्थांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासाठी नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण पाच हुतात्मा स्मारके आहेत. त्यापैकी मौजे चिंचपूर इजदे (ता. पाथर्डी) येथील हुतात्मा स्मारकाची देखभाल व परिरक्षण, अनुदान तत्त्वावर पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
यास्तव, पाथर्डी तालुक्यातील सर्व आणि विशेषतः ज्या गावात हुतात्मा स्मारक आहे, त्या गावातील नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांनी शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून अर्ज सादर करावेत.
इच्छुक संस्थांनी संस्थेचा नोंदणी दाखला व नियमावलीसह आपला अर्ज कार्यालयीन वेळेत दिनांक ३० जानेवारी २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावा.
शासनाच्या विहित अटी व शर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन शाखेत पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.
*******
#अहिल्यानगर #हुतात्मास्मारक #पाथर्डी #जिल्हाधिकारीकार्यालय #चिंचपूरइजदे #महाराष्ट्रशासन #देशभक्ती #प्रशासन #शैक्षणिकसंस्था